मुंबई

'रुको जरा, सबर करो!' हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: बेकायदेशीर आंदोलन करणे तसेच हिंसक कृत्य करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षा पद्धती संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज हिंदुस्थानी भाऊ यांनी पाठविले. मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. या कृतीमुळे जागोजागी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी तोडफोडही झाली. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी हिदुस्थांनी भाऊला अटक केली आहे. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याच्या जामीनाला पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे कोर्टाने त्याचा जामीन नाकारला.

धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊ जबाबदार असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल करून धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली होती. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हिंदुस्थानी भाऊचे वकील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरता! गुंतवणूकदार सावध; कोणते शेअर्स वाढले?

Dhangar Reservation: भाजपने धनगर समाजाला भरपूर दिले: खासदार वडकुते, मुख्यमंत्री फडणवीसांचे काम कौतुकास्पद

Marathi Bandishi Project: मराठी बंदिशींचे होणार दस्तावेजीकरण; पुस्तक, दृकश्राव्य स्वरूपात जतन, मराठी भाषा विभागाचा प्रकल्प

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

SCROLL FOR NEXT