Hindustani bhau esakal
मुंबई

टपाटप! हिंदूस्थानी भाऊला अखेर सशर्त जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता हिंदुस्तानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांना चिथावल्याबद्दल फाटक याला 1 रोजी अटक करण्यात आली होती. (Hindustani Bhau Latest News In Marathi )

हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर झाला असून मुंबई सेशन कोर्टने जामीन मंजूर केला आहे. धारावीतील हिंसक आंदोलन प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. हिंदुस्थानी भाऊच्या वतीने ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला होता. याआधी हिंदुस्तान भाऊचा बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला होता. सेशन्स कोर्टाकडून त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर सेशन्स कोर्टाने भाऊला जामीन मंजूर केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी राज्यभरात दहावी-बारावीच्या (Student Protest In Maharashtra) परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरा बाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर फाटक याला पोलिसांनी अटक केली होती. (Hindustani Bhau Get judicial custody for 14 days Custody)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT