Uddhav Thackeray 
मुंबई

Dasara Melava: 'गाई'चं हिंदुत्व बस्स झालं आता 'महागाई'वर बोला; उद्धव ठाकरेंचा भाजपवर टोला

महागाईनं संपूर्ण देश होरपळतोय तुम्हाला जनतेच्या वेदना जाणवत नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 'गाई'चं हिंदुत्व बस्स झालं आता 'महागाई'वर बोला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला. (Hindutva of cow is enough now talk about inflation Uddhav Thackeray attack on BJP)

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना कशी चालवायची हे शिंदे गटानं आम्हाला सांगायची गरज नाही. भाजपवाल्यांकडून तर मला हिंदुत्व सांगायची गरज नाही. आम्ही भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही आजही, उद्याही आणि मरु तेव्हाही हिंदूचं असणार. पण भाजपनं आमच्या हिंदुत्व शिकवायचं.

पाकिस्तानात जाऊन जीनाच्या थडग्यावर डोक ठेवणारे तुमच्या पक्षाची अवलाद, नवाज शरीफच्या वाढदिवसला न बोलावता केक खाणारे तुमचे नेते, काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्यांशी तुम्ही सत्ते बसणार तुम्ही आम्हाला हिंदुत्व कसं शिकवता? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

हिंदुत्व हिंदुत्व करत तुम्ही नुसतं गाईवर बोलणार कधीतरी महागाईवर बोलणार का? महागाईनं संपूर्ण देश होरपळतोय. पण या वेदना तुम्हाला जाणवू नये तर तुम्हाला हिंदुत्वाचा डोस द्यायचा गॅस महागला, भाज्या महागल्या, डाळी महागल्या, तर जय श्रीराम म्हणायचं, हे याचं काम. हे महागाईवर बोलत नाहीत.

मी संघाच्या होसबाळेंचं अभिनंदन करतो की, तुम्ही संघाला आणि भाजपला आरसा दाखवण्याचं काम केलं. वाढती बेकारी, गरीबी आणि विषमता यावर त्यांनी भाष्य केलं आशा एकच आहे आता आरसा दाखवल्यानंतर त्यांच्यात बदल होईल नाहीतर नुसतेच भांग पाडत बसतील,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT