Worli BMW Accident Esakal
मुंबई

Hit And Run Case Worli: हिट अँड रनचा आणखी एक बळी! वरळीत 'बीएमडब्ल्यू'च्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Worli BMW Accident: पुण्या-मुंबईमध्ये सुरू असलेल्या हिट अँड रन अपघातांची मालिका अद्याप सुरूच असून, वरळीत पुन्हा एकदा एका भरधाव बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्रासह पुण्या-मुंबईमध्ये सुरू असलेल्या हिट अँड रन अपघातांची मालिका अद्याप सुरूच असून, वरळीत पुन्हा एकदा एका भरधाव बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

बीएमडब्ल्यूच्या धडकेत 28 वर्षीय विनोद लाड गंभीर जखमी झाला होता. पण अपघाताच्या सात दिवसानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

२० तारखेला वांद्रे वरळी सी लिंकजवळ अब्दुल गफार खान मार्गावर आलिशान बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला मागून धडक दिली होती. यानंतर पीडीत तरुण गंभीर झाला होता.

अपघातात विनोदच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो कोमात गेला होता. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान अपघाता प्रकरणी कार चालक किरण इंदुलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरळीमध्ये भरधाव कारच्या धडकेत मृत्यू होण्याची ही महिन्यातील दुसरी घटना आहे. 9 जुलै रोजी कावेरी नाखवा नावाच्या महिलेला बीएमडब्ल्यू कारने दोन किलोमिटरपर्यंत फरफटत नेले होते. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

ज्या कारने नाखवा यांना फरफटत नेले ती बीएमडब्ल्यू कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजेश शाह यांची होती. अपघातावेळी शाह यांचा मुलगा मिहिर शाह दारू पिऊन कार चालवत होता.

दरम्यान सी लिंकजवळ अब्दुल गफार खान मार्गावर झालेल्या अपघातातील मृत तरुण विनोद लाड हा मूळचा मालवणचा असून, तो ठाण्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम करायचा. अपघातानंतर विनोद लाडवर नायर रूग्णालयात गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरू होते. या दरम्यान त्याच्यावर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : विक्रोळीत दुर्दैवी घटना! २५ लाखांच्या हंडीतून कोसळलेल्या गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Crime News: लग्न जमत नव्हत... शेवटी ठरलं पण पत्नी निघाली 'दरोडेखोर वधू', नवरा लावायचा नवीन तरुणांशी लग्न! अशा प्रकारे झाला पर्दाफाश

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT