मुंबई

सेवेतील अनियमिततेप्रकरणी रेलिगेअर विमाकंपनीला दणका; भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

दीपक शेलार

ठाणे ः अर्धांगवायूचा झटका आलेल्या मीरा रोड येथील रुग्णाला ग्राहकसेवेत अनियमितता दिल्याप्रकरणी ठाणे जिल्हा ग्राहक मंचाने खासगी विमा कंपनीला दणका दिला आहे. ग्राहक सेवेत त्रुटी असल्याचा ठपका ठेवीत मंचाने तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी 15 हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय दिला. तक्रारदाराच्या वकील अॅड.अश्विनी सार्जीणे यांच्या युक्तीवादानंतर मंचाचे अध्यक्ष एस.झेड. पवार आणि सदस्य पूनम व्ही.महर्षी यांनी हा निकाल दिला.

मिरा रोड येथे राहणारे रफीक छत्रीवाला यांना 2017 साली अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. छत्रीवाला यांचा रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा विमा असून या पॉलिसीच्या आधारे छत्रीवाला यांच्यावर उपचार करण्यात आले. 6 ते 22 सप्टेंबर दरम्यानच्या रुग्णालयाचा उपचार खर्च व मेडीकल रिसर्च सेंटरचा खर्च अशी 2 लाख 73 हजार 100 इतके शुल्क आकारले होते. यातील 2 लाखाच्या वरील 73 हजार 100 ही रक्कम देखील विमा कंपनीने देय असताना तक्रारदाराची पत्नी शमशा आणि मुलगा फैझान छत्रीवाला यांच्या म्हणण्यानुसार ती रक्कम विमा कंपनीने दिली नाही.

विम्याची रक्कम न देता तक्रारदाराच्या खात्यातून मात्र विमा हप्ता परस्पर काढून घेतल्याने विमा कंपनीच्या सेवेत अनियमितता आढळली. यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास सहन करावा लागला. विमा कंपनीच्या अनियमिततेमुळे मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 10 हजार आणि दाव्याचा खर्च 5 हजार अशी 15 हजारांची भरपाई देण्याचा निर्णय ग्राहक मंचाने दिला.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT