मुंबई

खळबळजनक! मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा

दीनानाथ परब

मुंबई: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मन्सुख हिरेन (Mansukh Hiran murder) हत्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. अँटिलिया कार स्फोटक (car explosive) आणि मन्सुख हिरेन हत्या (murder) प्रकरणाला आता चार महिने उलटून गेले आहेत. पण अजूनही या प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुरुवारी विशेष NIA कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मन्सुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखाचा व्यवहार झाल्याचा संशय (NIA) ने व्यक्त केला. (Hitmen were paid Rs 45 lakh to kill Mansukh Hiran NIA tells court)

आर्थिक व्यवहारांची जी माहिती मिळालीय, त्या आधारावर एनआयएने हा दावा केला आहे. लाल रंगाच्या तवेरा गाडीत मन्सुख यांची हत्या केल्यानंतर मारेकरी नेपाळला पळून गेला, असे एनआयएने सांगितले. चार मार्चला घोडबंदर रोडवर हिरेन सोबत मारेकरी दिसले, ते सीसीटीव्ही फुटेज मिळल्याचे NIA मधील सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी एनआयए कोर्टासमोर आरोपी सतीश तिरुपती मुतकोरी आणि मनिष बसंत सोनी यांना हजर करण्यात आले. एनआयएने दोन्ही आरोपींची आणखी पाच दिवसांसाठी कोठडी मागितली आहे. ४५ लाखाचा जो व्यवहार झालाय, त्या आधारावर एनआयएने आरोपींची कोठडी वाढवून मागितली आहे. हिरेनच्या हत्येसाठी इतकी रक्कम मोजल्याचा एनआयएला संशय आहे. मन्सुख हिरेनच्या हत्येसाठी कोणी पैसा पुरवला? ते NIA ने सांगितले नाही. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली, त्यावेळी ती कार हिरेन यांच्याकडे होती. कार सापडल्यानंतर हिरेन यांनी सचिन वाझेचे आदेश मान्य करण्यास नकार दिल्याचे बोलले जाते. ४५ लाख हे फक्त हिमनगाचं टोक आहे. पण प्रत्यक्षात अँटिलिया आणि हिरेन हत्या या दोन प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा व्यवहार असल्याचा दावा NIA ने केला आहे. हिरेनची हत्या करणाऱ्या एका आरोपीकडून ३५ हजाराची रोख रक्कम ताब्यात घेतल्याचे सरकारी वकिलाने कोर्टाला सांगितले. बर्खास्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या निर्देशावरुन ही हत्या झाल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाचे राज्याच्या राजकारणार गंभीर पडसाद उमटले आहेत. त्यातून अनेक गोष्टींची साखळी उघड झाली. येणाऱ्या पुढच्या काही महिन्यातही या प्रकरणातून अजून धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT