मुंबई

मुंबईकरांनो नियम मोडून रंगपंचमी खेळायला गेलात तर...

पूजा विचारे

मुंबई: यावर्षीही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं होळी आणि रंगपंचमीच्या सणावर निर्बंध लादले आहेत.  यंदा होळी आणि धुलिवंदनावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता मुंबई पालिकेनं होळी आणि रंगपंचमी हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई केली आहे. पालिकेनं तसे नियमच आखून दिलेत. तरीही नागरिकांनी नियमांचं भंग केल्यास पोलिस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.  तसंच नियमांचे पालन होतं आहे की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. 

होळी, धुळवड आणि रंगपंचमीवर बंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास साथ नियंत्रण कायदा 1897,आपात्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही कोविडमुळे होळी आणि धुळवडीवर संक्रांत आली होती. त्यातच यंदा कोविडच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होऊ लागल्याने पालिकेने पुन्हा कठोर निर्णय घेतला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी होळी धुळवड आणि रंगपंचमी खासगी, सार्वजनिक ठिकाणी साजरे करु नये असे सक्त निर्देश देण्यात आले. तसेच वैयक्तिक रित्याही शक्यता हे सण न साजरे करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास साथ नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार कारवाई होणार आहे. यात काही महिन्यांचा तुरुंगवास तसेच दंड अशी कारवाई होऊ शकते.

महानगर पालिका या काळात संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागातील ही पथके सार्वजनिक ठिकाणी तसेच संकुलांमध्येही लक्ष ठेवणार आहे. कोविड हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचीही गस्त असेल.

काय आहे नियमावली 

कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी २८ मार्चला साजरा होणारा 'होलिकोत्सव' आणि २९ मार्चला साजरा होणारा 'धुलिवंदन' किंवा 'रंगपंचमी' हा उत्सव खाजगी आणि सार्वजनिक जागेत सार्वजनिकरित्या साजरा करण्यास महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक स्तरावर होळी आणि रंगपंचमी साजरी न करण्याच्या आदेशांसोबतच 'मी जबाबदार' या मोहिमेअंतर्गत वैयक्तिकरित्यादेखील हा उत्सव साजरा करणं टाळावं असं आवाहन पालिकेकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने ट्विट करून एक परिपत्रक पोस्ट केलं आहे. होळी आणि धुलिवंदन साजरं करण्यावर निर्बंध लादण्यात आल्याची माहिती या ट्विटमधून देण्यात आली आहे. "मुंबईला सुरक्षेच्या रंगात रंगवूया! कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी होलिकोत्सव व धुलिवंदन/रंगपंचमी खाजगी तसेच सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल", अशा इशारा या ट्वीटच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तसेच, मी जबाबदार हा हॅशटॅगही त्यासोबत ट्वीट करण्यात आला आहे. 

Holi 2021 rules and regulations by bmc for Rangpanchmi festival Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT