mumbai police esakal
मुंबई

Holi Festival : होळी सणाच्या निमित्ताने मुंबई पोलीसांकडून नियमावली जाहीर

मुंबईसह राज्यभरात आता होळी आणि धुलीवंदनाच्या सणाला लवकरच सुरूवात होणार आहे. होळी आणि धुलीवंदनाचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईसह राज्यभरात आता होळी आणि धुलीवंदनाच्या सणाला लवकरच सुरूवात होणार आहे. होळी आणि धुलीवंदनाचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मुंबई - मुंबईसह राज्यभरात आता होळी आणि धुलीवंदनाच्या सणाला लवकरच सुरूवात होणार आहे. होळी आणि धुलीवंदनाचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचे सण 5 आणि 6 मार्च या दिवशी साजरे केले जाणार आहेत.हा संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आदेश देण्यात आला असून नियमावली जाहीर केली आहे. आदेश 5 मार्च 2023 ते दिनांक 11 मार्च 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या सणांसाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी खास नियमावली तयार केली आहे. या नियमाचे पालन करत सण साजरे करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले असून नियम न पाळल्यास कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

उत्सव काळात 'या' नियमांचे पालन करावे..

- या कालावधीत फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू, गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये.

- रंगपंचमी साजरी करताना पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू किंवा फेकू नये.

- तसेच रंग खेळताना रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे मारू किंवा फेकू नये.

- सणांच्या काळात अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण करू नये किंवा अश्लील गाणी सुद्धा म्हणू नयेत.

- अश्लील हावभाव किंवा नक्कलाचा वापर करू नये.

- कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावेल अशी चिन्हे, चित्रे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू, गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये

दरम्यान, या आदेशाचे कोणीही उल्लंघन केले किंवा या आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत केली तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार शिक्षा केली जाणार आहे. हे आदेश व नियम 5 मार्च 2023 ते दिनांक 11 मार्च 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT