MSRTC bus esakal
मुंबई

Holi In Kokan: कोकणात चाललेल्या सर्व एटी बसेस झाल्या हाऊसफुल; चाकरमान्यांची दर्शवली पसंती

होळीच्या उत्सवासाठी चाकरमान्यांची एसटीकडे धाव; आरक्षणात वाढ

सकाळ वृत्तसेवा

Railway News: मुंबई, ठाणे, पालघर या भागांतून अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह होळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जातात.

कोणत्याही वाहतूक सुविधेपेक्षा कोकणच्या चाकरमान्यांना एसटी अधिक जवळची वाटते. कारण ती त्यांना थेट त्यांच्या वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचवते. यंदा कोकणात जाणाऱ्या एसटीच्या २३९ जादा बसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीसाठी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. २० ते २५ मार्चदरम्यान जादा वाहतूक होणार आहे.

होळीकरिता मुंबई विभागातून ९३, तर ठाण्यातून १२६ जादा एसटीचे आरक्षण आतापर्यंत फुल्ल झाले आहे. यामध्ये ग्रुप बुकिंगच्या एसटीचादेखील समावेश आहे.

मुंबईतून कोकणात होणारी होळी जादा वाहतूक (२० ते २५ मार्च)

विभाग-----ग्रुप बुकिंग----आरक्षण------एकूण


मुंबई------४२------------५१---------९३
पालघर-------११---------९----------२०
ठाणे-----------२०------१०६------------१२६
एकूण--------७३--------१६६----------२३९s

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT