home minister anil deshmukh statement about Mumbai nightlife for 26 january Photo Source : pinterest.com 
मुंबई

मुंबईच्या 'नाईट लाईफ'विषयी अनिश्चितता; गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले पाहा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय येत्या 26 जानेवारीपासून लागू होण्याची चर्चा सुरू होती. पण, खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. याबाबत कॅबिनेट मिटिंगमध्ये निर्णय घेऊनच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलंय. 

काय म्हणाले अनिल देशमुख?
मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून नाईट-लाईफ सुरू होणार असल्याची चर्चा होती. पण, त्या संदर्भात सरकारकडून कोणतिही अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, 'मला वाटत नाही मुंबईत नाईट-लाईफ येत्या 26 जानेवारीपर्यंत सुरू होईल. कारण, हा विषय पहिल्यांदा कॅबिनेट मिटिंगमध्ये चर्चेला येईल. येत्या 22 जानेवारीला कॅबिनेट मिटिंगमध्ये याची चर्चा होईल. त्यात सर्व बाबीवर चर्चा होईल आणि त्यानंतरच निर्णय होईल. मुळात नाईट-लाईफमुळं पोलिस यंत्रणेवर ताण येणार आहे हे निश्चित. याबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल. नाईट-लाईफची मागणी ठीक आहे. पण, ही वाढ होत असताना यंत्रणा नीट आहे का? ह्याचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल.'

मुंबईत रेस्टॉरंट्स आणि हॉटेल 24 तास सुरू ठेवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट-लाईफ सुरू होण्याची चर्चा सुरू होती. सरकारकडूनही त्याबाबत संकेत देण्यात आले होते. पण, अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यासंदर्भात कॅबिनेट मिटिंगमध्ये चर्चा करून आणि सगळ्याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केलंय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केली, आम्ही हे सहन करणार नाही - मुख्यमंत्री

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT