Dilip Walse-Patil टिम ई सकाळ
मुंबई

दिलीप वळसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नाराजी नाट्यानंतर घडामोडींना वेग

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. राज्यात अधिवेशनापासून गृहमंत्रालयाच्या कारवायांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यातच पेनड्राईव्ह प्रकरणात गृहमंत्र्यांची महत्वाची भूमिका राहिली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे हे नाराजीनाट्य रंगलं. (Dilip Walse Patil Meets CM Uddhav Thackeray)

यानंतर गृहमंत्री वळसे पाटील आता तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याचं वृत्त आहे. याआधी ते काही काळ मंत्रालयात असणार आहेत. राज्यातील गृह विभागाच्या कारभार यावरून वळसे यावर काँग्रेस सेनेने नाराजी व्यक्त केली. त्याची ही परिणीती असल्याची चर्चा आहे. गृहमंत्रालयाने प्रवीण दरेकरांच्या प्रकरणात अद्याप अहवाल दिलेला नाही.

पोलिसांच्या बदलांच्या संदर्भात महत्वाचे निर्णय अद्याप पेंडिंग आहेत. संजय राऊत यांनी गृहखातं सक्षम असणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. दहा डिसीपींच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बदलण्यात आल्या. मधील काळात आय़पीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात चर्चा होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मार्च महिन्यात घेण्याचं सांगितलं.

जाहीर कार्यक्रमात हातात तलवार घेऊन उंचावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले. मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि वळसे पाटील यांच्यात खलबतं सुरू झाली आहेत.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कंबोज यांनी ट्वीट करत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना कारवाई करण्याची विनंती केली.

दोन्ही पालकमंत्र्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य होतं. अखेर त्यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवली. याप्रकरणावर मविआ सरकारमधील पक्षांची नाराजी होती. त्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचा फुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT