मिरा रोड येथील प्रचार सभेत उपस्थित गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा सन्मान करताना मान्यवर.
मिरा रोड येथील प्रचार सभेत उपस्थित गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा सन्मान करताना मान्यवर. 
मुंबई

होय, राफेलची पूजा केल्याचा मला अभिमान

सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड ः होय, मी पॅरिसमध्ये जाऊन राफेलची शस्त्र पूजा केली. दसऱ्याला आम्ही शस्त्र पूजा करतो, त्यात गैर काय? असा सवाल करीत याचा मला अभिमान वाटतो, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. या वेळी मी ओम काढला, त्यावरही यांचा विरोध. अरे, सर्व धर्मात थोड्याफार फरकाने ओमचा उच्चार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मिरा रोड येथे भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारसभेत बोलताना सिंह यांनी, भारत आता कमजोर देश राहिला नसून सर्व बलाढ्य राष्ट्रांबरोबरीने उभा असल्याचे सांगितले. दुर्दैवाने कॉंग्रेस नेते काश्‍मीर प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करीत असल्याचे सांगत त्यांनी यावर टीका केली.

काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचे वचन आम्ही जनतेला दिले होते. 2019 लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट रोजी हे कलम रद्द केले. देशभरातील जनतेने त्याचे स्वागत केले असतानाच विरोधक मात्र टीका करत आहेत. या वेळी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, दीपाली मोकाशी, रवी व्यास, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उपस्थित होते. 

दोन वर्षांत दोन कोटी लोकांना घरे देणार 
सहा महिन्यांत 18 हजार गावांत विद्युत पुरवठा, गॅस जोडणी उपलब्ध केल्याचा दावा त्यांनी या वेळी केला; तर आगामी दोन वर्षांत दोन कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार असल्याचे सिंह यांनी सांगितले; तर गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शहरांसाठी तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती नरेंद्र मेहता यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT