मुंबई

हुश्‍श! मुंबईवरचा मोठा धोका टळला; 11 हजार जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता असलेल्या 11 हजार 368 जणांचा धोका टळला आहे. या सर्वांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. 

मुंबईत आतापर्यंत 2120 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांच्या संपर्कातील 57 हजार 700 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 11 हजार 368 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. म्हणजेच त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका टळला आहे. मुंबईत सध्या 8000 "हाय रिस्क' व्यक्ती आहेत. 
कोरोनाचा शिरकाव चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये झाल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्यात एका रुग्णाच्या संपर्कातील सरासरी 27 जणांना क्वारंटाईन करावे लागते. कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तींना सहसा घरातच एकांतात ठेवले जात आहे. 
अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

कोरोनाची लागण झाल्यानंतर पाच-सहा दिवसांत ताप, कोरडा खोकला, सर्दी अशी लक्षणे दिसतात. विषाणूंची संख्या अब्जावधीवर गेल्याचे ते निदर्शक असते. व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार विषाणूंची संख्या वाढते. 14 दिवसांत विषाणूंची संख्या न वाढल्यास रोगप्रतिकारक शक्ती वरचढ झाल्याचे मानले जाते. त्यामुळे 14 दिवसांचा क्वारंटाईनचा काळ महत्त्वाचा असतो. 

लक्षणे नसलेले देखरेखीखाली 
महाराष्ट्रात कोरोनाची बाधा होऊनही लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मुंबईतही असे 473 रुग्ण महापालिकेच्या देखरेखीखाली आहेत. अशा रुग्णांना लक्षण दिसणाऱ्या रुग्णांबसोबत न ठेवता स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. त्यांच्यासाठी 519 खाटा असलेली सात रुग्णालये तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT