cancer 
मुंबई

#HopeofLife : मुंबई महापालिकेचे पहिले कर्करोग रुग्णालय २०२१ मध्ये

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे कर्करोग रुग्णालय माझगाव येथे येत्या वर्षात सुरू होणार आहे. खासगी भागीदारीतून हे १०० खाटांचे रुग्णालय २०२१ च्या सुरुवातीपर्यंत सुरू होणार आहे.

प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. सुलतान प्रधान यांच्या संस्थेतर्फे हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. महानगरपालिकेने यासाठी भूखंड उपलब्ध करून दिला असून त्यावर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यातील २० टक्के खाटा या गरजू रुग्णांसाठी राखीव असणार असल्याचे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

या सात मजली रुग्णालयात पाच अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, त्याचबरोबर आयसीयूची सुविधा असणार आहे. तसेच रुग्णांना रेडिएशन देण्याचीही सोय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात  येणार आहे. 

गरजूंना दिलासा मिळणार
मुंबईत २०१५ मध्ये मुंबईत कर्करोगाचे १३ हजार ९० रुग्ण आढळले होते. त्यातील साधारण चार ते सव्वा चार हजार रुग्ण हे टाटा रुग्णालयात उपचार घेतात. मात्र, निम्म्याहून जास्त रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. पालिकेच्या या रुग्णालयांमुळे मुंबईतील गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. नवीन कर्करोग रुग्णालय उभारणीचे काम योग्य गतीने सुरू असून या रुग्णालयावर पालिकेची देखरेख राहणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एम्सच्या धर्तीवर सेव्हन हिल्स रुग्णालयाचा वापर
मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. हे रुग्णालय उभे असलेला भूखंड कर्करोग रुग्णालयासाठी आरक्षित होता. त्यासाठी इमारतही उभारण्यात आली होती. मात्र, पालिकेने नंतर सेव्हन हिल्स रुग्णालयाशी करार करून हा भूखंड त्यांना दिला. महापालिका या ठिकाणी एम्सच्या धर्तीवर आणि टाटा कर्करोग रुग्णालयाच्या मदतीने कर्करोग रुग्णालय उभारण्याचा विचार करत आहे.

चंद्रपूरसह पुण्यात दोन वर्षांत विभाग स्तरावर कर्करोग रुग्णालय
राज्यात विभाग स्तरावर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात औरंगाबाद येथील कर्करोग विशेष रुग्णालयाची क्षमता वाढविण्यात येणार असून चंद्रपूर आणि पुण्यातही कर्करोगासाठी विशेष रुग्णालय येत्या दोन वर्षांत उभे राहील, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. औरंगाबाद आणि नागपूर येथे १०० खाटांचे रुग्णालय आहे. तेथे केमोथेरपी आणि रेडिएशनची सोय आहे. औरंगाबाद येथील रुग्णालयात २६५ खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. चंद्रपूर व पुण्यातही प्रत्येकी १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT