cancer 
मुंबई

#HopeofLife : नऊ जिल्ह्यांत लवकरच केमोथेरपी उपचारकेद्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कर्करोगाला आळा घालण्यासाठी घरा-घरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत केमोथेरपी उपचार दिले जात आहेत. लवकरच कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही केमोथेरपी उपचार सुरू होणार असून त्यानंतरच्या टप्प्यात ठाणे, रायगडसह सात जिल्ह्यांत हे उपचार सुरू होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याच्या १४ जिल्ह्यांतील केमोथेरपी विभागामध्ये आतापर्यंत २८०० कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉक्‍टर आणि परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच या जिल्ह्यांमध्ये केमोथेरपी केंद्र सुरू होईल. त्यानंतर ठाणे, रायगड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांतील डॉक्‍टर आणि परिचारिकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.

’कॅन्सर वॉरियम’तर्फे ३२०० शस्त्रक्रिया
टाटा कर्करोग रुग्णालयात प्रशिक्षण घेतलेले डॉक्‍टर आणि खासगी डॉक्‍टरांनी कॅन्सर वॉरियर संघटनेची स्थापना केली आहे. गावपातळीवर कर्करोगाची मोफत तपासणी केली जात आहे. सध्या २३ जिल्ह्यांमध्ये ही तपासणी केली जात आहे. याअंतर्गत गत तीन वर्षांत ४० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ३२०० शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी  सांगितले.

जनआरोग्य योजनेतून आठ लाख कर्करुग्णांवर उपचार

  • राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केले जात असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ८ लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
  • सर्वसामान्यांना आवाक्‍याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरू असलेल्या महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधित विविध उपचार सुमारे ८ लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. कर्करोगाला आळा घालण्यासाठी सध्या लोकसंख्या आधारित तपासणी कार्यक्रम सुरू आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आशा कार्यकर्ती व एएनएमच्या माध्यमातून प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जात अाहे.
  • जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून राज्यात ३१ मे ते ३० जून या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ८ लाख २७ हजार ९७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. नाशिक आणि अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालयातही कर्करोगावरील उपचार सुविधा दिल्या जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT