मुंबई

शेवटी नको तेच झालं ! चार रुग्णालयांनी नाकारलेला पोलिस अखेर कोरोना पॉझीटीव्ह...

सकाळवृत्तसेवा

मुंबई,ता.25: कोरोनाची लक्षण असूनही चार पालिका रुग्णालयांनी दाखल करून घेण्यासाठी नकार दिलेला पोलिसाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. एका वरिष्ठ अधिका-यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या पोलिसाला उपचारासाठी चार सरकारी रुग्णालयात फिरायला लागले. कोणीच त्यांना रु्ग्णालयात दाखल करून घेतले नाही, अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. दै. सकाळने सर्वप्रथम हा प्रकार उघड केला होता.

संबंधीत पोलिस हवालदार कुर्ला वाहतुक विभागात कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी (ता.20) ताप आल्यामुळे त्यांनी स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. पण फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. याबाबत त्यांनी मुलाला सांगितल्यानंतर त्यांचा मुलगा आजारी वडिलांना घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेला. तेथील डॉक्टरांनी या पोलिसाला जागा नसल्यामुळे तुम्ही नायर रुग्णालयात जा, असे सांगितले. त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही व बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले.

त्यानंतर या आजारी पोलिसाचा मुलगा त्यांना वडिलांना घेऊन परळ येथील केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. सगळीकडे हेळसांड झाल्यानंतर केईएम रुग्णालयात तरी वडिलांना दाखल करण्यात येईल, असे त्यांना वाटले. पण तेथेही डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही व जागा नसल्यामुळे तुम्ही कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले. सगळीकडून भरती करण्यास नकार देण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या पोलिसाच्या वरिष्ठांनी केईएम रु्गणालय ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते अशा भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला व घडलेल्या सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.

अखेर भोईवाड्यातील पोलिसांनी विनंती केलयानंतर या पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या पोलिसाचा कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

horrible four hospital refuses to admit police officer detected positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT