मुंबई

महाडमधील भीषण घटना, दोन चिमुरड्यांचा बंद कारमध्ये गुदमरून मृत्यू

सुनील पाटकर

महाड, ता. 30 : मुंबई - गोवा महामार्गालगत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद कारमध्ये दोन लहानग्या सख्ख्या भावांचा बुधवारी सायंकाळी गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सोहेल जकात खान वय 5 वर्ष आणि अब्बास जकात खान वय 3 वर्ष अशी मृत्यू झालेल्या या लहानग्यांची नावे आहेत. नांगलवाडी येथे एक भंगाराचे गोदाम असून येथे ही बंद कार उभी होती. या कारमध्ये सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खेळत असताना अब्बास व सोहेल यांच्या हातून अचानक गाडीचा दरवाजा आतून लॉक झाला. या दोघांनाही बंद गाडीचे दरवाजे आणि काचा उघडणे शक्य झाले नाही. यामुळे गाडीमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती समजताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी आणि साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही मुलांना बाहेर काढले; परंतु ते दोघे मरण पावले होते. महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी नेले आहेत. याप्रकरणी औद्योगिक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व शोक व्यक्त होत आहे.

horrible incident mahad midc two kids lost life after locked in car

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT