Hospital workers protest after Patients relatives assaulting doctor hospital Staff In Thane marathi news rak94 
मुंबई

Thane News : ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची ब्रदर्स अन् दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण; डॉक्टर, कर्मचारी आक्रमक

संतापलेल्या ५ ते ६ नातेवाईकांनी तेथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला (परिचारक) मारहाण केली. तसेच चाकूच धाक दाखविला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स (परिचारक) आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखविल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ .०० वाजता आंदोलन केले. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी पहाटे ४.३० सुमारास वागळे इस्टेट येथील एका व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत, त्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या ५ ते ६ नातेवाईकांनी तेथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला (परिचारक) मारहाण केली. तसेच चाकूच धाक दाखविला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यावेळी ड्युटी वरील पोलीस हे हजर नव्हते, असे देखील रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

रुग्णालयात घडलेला प्रकार हा निंदनीय असून त्याचा निषेध व्यक्त करतो. रुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

    - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT