Temperature in Mumbai sakal media
मुंबई

मुंबईत वातावरण तापलं; प्रदूषणही वाढलं!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उन्हाच्या काहिलीसह प्रदूषणाचाही (summer and pollution) तडाखा मुंबईकरांना बसत आहे. शहरात रविवारी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवेचा दर्जाही (Bad air quality) वाईट स्थितीपर्यंत नोंदला गेला. हवामान विभागाने (whether update) कोकणात ढगाळ वतावरणासह हलक्या सरींचा अंदाज (Little rain) वर्तवला आहे, तरीही दिवसभरातील कमाल तापमान चढे असल्याचे दिसले. सांताक्रूझ येथे ३६.३; तर कुलाबा येथे ३२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली. सांताक्रूझ येथे २२.०; तर कुलाबा येथे २०.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवेतील आर्द्रताही वाढली. कोकणातील ढगाळ वातावरणामुळे उष्मा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र वातावरणात फारसा बदल अद्याप तरी झालेला नाही.

माझगावची स्थिती वाईट

मुंबईतील हवेचा दर्जा वाईट नोंदला गेला. हवा गुणवत्ता निर्देशांक २३५ सह मुंबईतील प्रदूषण कायम असल्याचे दिसले. त्याच वेळी अंधेरी, मालाड आणि माझगावमधील स्थिती वाईट नोंदवली गेली. माझगाव ३३१, मालाड ३२६ आणि अंधेरी ३०१ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा अतिशय वाईट नोंदला गेला. कुलाबा २११, नवी मुंबई २१८ हवेचा दर्जा वाईट आहे; तर भांडुप, वरळी, बोरिवली, बीकेसी आणि चेंबूर येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या आत असून मध्यम नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT