मुंबई

भिवंडीतील ढाबे सजले; कोरोना नियम मात्र धाब्यावर

रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

भिवंडी : राज्यात ओमिक्रॉनचा (omicron)प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात नाताळच्या सुट्या(christmas holiday) आणि नववर्ष जल्लोषानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करून कोरोनाला आमंत्रण देण्याची शक्यता असल्याने सरकारने निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये हॉटेल, रिसॉर्ट्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश असताना भिवंडीतील महामार्गालगत असलेले ढाबे सरकारचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी अवैध मद्यविक्रीही होत असून, रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नववर्षाच्या आगमनाचे वेध सर्वांना लागले आहेत. या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात जल्लोष करण्याचे अनेकांचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनाला निघत आहेत. भिवंडी तालुक्यातून वाडा, वसई, पारोळ, खारबाव, नाशिक, कल्याण आदी मार्गावर तसेच मुंबई-नाशिक महामार्गालगत(mumbai-nashik highway) शेकडो ढाबे आहेत. या ढाब्यांना रात्रीच्या वेळी अक्षरशः जत्रेचे स्वरूप येते. रात्री ९ नंतर या ढाब्यांसमोरील पार्किंग पूर्णतः भरून जाते. कोणत्याही ग्राहकाच्या तोंडावर मास्क नसतो, तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही तीन तेरा वाजतात. एकूणच कोरोना नियमांचे पालन या ठिकाणी होत नसल्याने प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

भिवंडीसह आसपासच्या परिसरात अधिकृत २९० बिअरबार आहेत. तालुक्यातून वाडा, वसई, पारोळ, खारबाव, नाशिक, कल्याण आदी मार्गांवर, तसेच मुंबई-नाशिक महामार्गालगत शेकडो ढाबे आहेत. या ढाब्यांवर सकाळपासूनच खुलेआम मद्यविक्री होते. बारचालक लाखो रुपयांचे उत्पादन शुल्क भरून आपला व्यवसाय करतात. असे असताना अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने सरकारचा महसूलही बुडत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अधिकृत मद्यविक्रेत्यांकडून होत आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहर परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सुरू आहे. सरकार व पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या हॉटेल, ढाब्यांसह वाहन चालक व नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

- योगेश चव्हाण, पोलिस उपायुक्त, भिवंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT