मुंबई

हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ, विरोध करुन शिवसेनेने प्रस्ताव मंजूर केला

समीर सुर्वे

मुंबई : कोविड काळात महानगर पालिका कर्मचाऱ्यांना राहाण्याची सुविधा पुरविणाऱ्या 182 हॉटेल्सचा यंदाचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेनेने बहुमताने मंजूर केला. आश्चर्य म्हणजे शिवसेनेने सुरवातीला या प्रस्तावाला विरोध केला होता.

कोविड काळात महानगर पालिकेचे डॉक्टर्स, परीचारीक तसेच इतर कर्मचाऱ्यांना माफक दरात राहाण्याची सुविधा काही हॉटेल्सने उपलब्ध करुन दिली होती. या हॉटेल्सचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार कर माफ करण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. त्यावर सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी आक्षेप घेतला. विरोधीपक्षनेते रवी राजा यांच्यासह इतर सदस्यांनीही या प्रस्तावावर आक्षेप घेतला. या हॉटेल्सना पालिकेने भाडे दिले आहे. त्यामुळे त्यांना ही सुट देण्याची गरज नाही अशी भुमिका सदस्यांनी मांडली. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

निवासी करदात्यांनाही सुट

कोविडची सुरवातीचे तीन महिने सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे. नोकरदार, व्यवसायिक या सर्वांसाठीच हा काळ कठीण होता. त्यामुळे हॉटेल्स उद्योगांना ही सुट मिळत असेल तर सामान्य करदात्यांनाही सुट मिळायला हवी.अशी भुमिका भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी मांडली.निवासी करदात्यांना तीन महिन्याच्या मालमत्ता करातून सुट द्यावी अशी मागणी त्यांनी केली.  

144 कोटींची थकबाकी

मुंबईतील हॉटेल्सची 144 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्याबद्दल पालिकेने नोटीसही पाठवली होती. आज सूट देण्याचा निर्णय झालेल्या हॉटेल्सचाही यात समावेश आहे. मात्र आता याच हॉटेल्सना या वर्षीच्या मालमत्ता करात सूट देण्यात येत आहे. 

hotel owners of mumbai get property tax exemption decision taking in standing committee

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT