मुंबई

...हातात नाही पैसे, खिन्न मनाने आता 'त्याही' म्हणतायत "मॅडम काम पर आऊ क्या?"

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि रूग्ण संख्येमुळे काटेकोर लाॅकडाऊन पाळला जात आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना देखील काम सोडून घरी बसावे लागले आहे. त्यात लाॅकडाऊनचा काळ वाढल्याने एकएक दिवस पुढे ढकलणे या महिलांना कठिण जात आहे. काम नसल्याने उदरनिर्वाहाच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केल्याने अनेक घरकाम करणाऱ्या महिला 'मॅडम काम पर आऊ क्या?' अशी हाक देत आहेत; परंतु सध्या तरी कामाला येऊ नका, असेच उत्तर मिळत असल्याने करायचे तरी काय? घरात पैसा नाही की खायला एक कण नाही, अशी व्यथा घरकाम महिला व्यक्त करत आहेत.

या महिला धुणीभांडी, जेवण बनवणे, स्वच्छता करणे आदी कामे करून आपले व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितात; मात्र लाॅकडाऊनमुळे सर्व काम ठप्प पडले. घरातील किराणा डब्बे पूर्ण रिकामे आहेत. सगळे काही संपल्यानंतर महिला जेथून रोजगार उपलब्ध होत होता त्यांना कामावर पुन्हा येऊ का? अशा विनवण्या करत आहेत. परंतु सध्या तरी कामाला येऊ नका, असेच उत्तर मिळत असल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी असल्याने दुसरे काम तरी कोण देणार? हा प्रश्न असल्याने सध्यातरी कोणचा मार्ग दिसत नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली.

मदतीचे हात पुढे यावेत
घरकाम करणाऱ्या महिलांसाठी घर कामगार युनियन, महाराष्ट्र यांच्या पवई शाखेने पवईतील नोंदणीकृत घरकामगार 120 महिलांना अन्नधान्याचे किट वाटप मंगळवारी वाटप केले. महिलांना महिनाभर पुरेल एवढे किराणा सामानही युनियनकडून देण्यात आले. तसेच, आणखी 80 गरजूंना हे किट युनियनतर्फे दिली जाणार आहेत; मात्र घरकामगार महिलांची संख्या पाहता आणखी मदतीची अपेक्षा करण्यात येत आहे.

house maids are calling for resuming of their household jobs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT