Vijay Wadettivar_Pooja Khedkar 
मुंबई

Pooja Khedkar : पूजा खेडकरला क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळालंच कसं? वडेट्टीवारांचा सवाल, चौकशीची केली मागणी

आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर या अनेक गैरप्रकारांमुळं सध्या चर्चेत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर या अनेक गैरप्रकारांमुळं सध्या चर्चेत आहेत. आयएएसची पोस्ट मिळवताना त्यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. खेडकर यांना हे प्रमाणपत्र मिळालंच कसं? असा सवाल त्यांनी केला असून याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. (How did Pooja Khedkar get Non Creamy Layer Certificate Vijay Wadettivar raised question and demanded inquiry)

वडेट्टीवार म्हणाले, "पूजा खेडकर या महिलेची आयएएससाठी झालेली निवड ही चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे. तिनं सादर केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी व्हायला हवी होती. खरंतर ही तपासणी युपीएससीकडून अतिशय कडक पद्धतीनं केलं जातं. त्याचबरोबर तीनं अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं आहे, हे तिला कसं मिळालं? ते खोटं आहे"

याच्याही पुढं जाऊन त्यांनी क्रिमी लेअरचा देखील जो फायदा घेतला आहे तो चुकीच्या पद्धतीनं घेतला आहे. हा विषय जात पडताळणी संदर्भातील आहे. हे सगळं आम्ही सोशल मीडिया आणि मीडियामध्ये ऐकलेलं आहे. त्याचबरोबर एखाद्याच्या कॅबिनमध्ये बसणं त्याचा फायदा घेणं.

या महिलेचे वडील हे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत, ते ऑडी सारख्या आलिशान कारमध्ये फिरतात ते नॉन क्रिमीलेअर कसे आहेत? तिच्या वडिलांनी निवडणुकीच्यावेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची संपत्ती ४० कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं हे नॉन क्रिमीलेअरच्या परिघात कसे काय येऊ शकतात? त्यामुळं या सर्व गोष्टी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं लोकांची मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे तशी आमचीही मागणी आहे की याची चौकशी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT