hsc board result  sakal media
मुंबई

बारावीच्या निकालाचे कामकाज पूर्ण, तारखेची घंटा कधीही वाजणार

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या (State Education) बारावीच्या निकालाची (HSC Result) कामकाज जवळजवळ पूर्ण झाले आले आहे. त्यामुळे मंडळाने हा निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठीची घोषणा (HSC result Declaration) लवकरच केली जाईल अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यात कोल्हापूर आणि कोकणात अतिवृष्टी (kolhapur kokan rainfall) झाल्याने काही भागातून निकालाची माहिती येणे बाकी असून उर्वरित ठिकाणची माहिती मंडळाकडे आली असल्याने हा निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असेही सांगण्यात आले. ( hsc result work completed it will announce anytime - nss91)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावीप्रमाणेच बारावीची परीक्षाही रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर आधारित उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि प्राचार्याकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कामकाज नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यासाठीची संपूर्ण यादी मंडळाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वी बारावीचे निकाल जाहीर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते, त्या मुदतीपूर्वीच राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला होता. मात्र तब्बल महिन्याभरानंतर त्यासाठीच्या मूल्यमापन कार्यपद्धती ठरविण्यात आली. त्यानंतर जीआर जारी करून कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र मंडळाकडून मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात निर्णय घेण्यासाठी मोठा उशीर लावल्याने यासाठी महिनभराहून अधिक काळ वाया गेला असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT