डोंबिवली रेल्वे स्थानक  
मुंबई

सकाळी ६.३० पासून रेल्वे पास मिळविण्यासाठी डोंबिवली स्थानकात नागरिकांची गर्दी

15 ऑगस्टपासून कोविड लसीचे 2 डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली: 15 ऑगस्टपासून कोविड लसीचे (covid vaccination) 2 डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास (railway travel) करण्याची संधी मिळणार आहे. रेल्वे पास (railway pass) वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटर शेजारी केडीएमसीतर्फे (KDMC) स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात आला असून पालिकेचे प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते हे सकाळी 6 पासून केंद्राच्या ठिकाणी हजर होते. सकाळी 6.30 वाजल्या पासून कोड स्कॅन करून घेऊन पालिकेचा शिक्का मारून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

काही नागरिक मोबाईल मधील सर्टिफिकेट दाखवत होते, काही नागरिकांचे क्यू आर कोड स्कॅन होत नसल्याने त्यांना पुन्हा पालिका लसीकरण केंद्रावर जाऊन योग्य सर्टिफिकेट घेऊन येण्याचा सल्ला दिला जात होता.

"महापालिका कार्य क्षेत्रातील डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, टिटवाळा, आंबिवली, शहाड या 6 रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर लसीकरण प्रमाणपत्राची आणि फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका कर्मचारी तैनात आहेत. सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत हे सुरू राहणार असून नागरिकांनी गर्दी न करता या सुविधेचा लाभ घ्यावा."'

- सुहास गुप्ते, ह प्रभागक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेष साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : भागीदारीतील अडथळे दूर होणार, करिअरमध्ये नवे मार्ग सापडणार

IPL 2026 Point Table: राजस्थान रॉयल्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? SRH, KKR, CSK कडून हवीय मदत... जाणून घ्या गमतीदार गणित

सिंह साप्ताहिक राशिभविष्य (१० मे २०२६ ते १६ मे २०२६) : करिअरमध्ये उघडणार नवे दरवाजे; प्रसिद्धी आणि आर्थिक लाभाचे संकेत

साप्ताहिक राशिभविष्य : (१० मे २०२६ ते १६ मे २०२६)

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

SCROLL FOR NEXT