मुंबई

नॅशनल पार्कमध्ये वन मंत्र्यांसमोरच गोंगाट!

सकाळवृत्तसेवा

मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे जंगलातील प्राण्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा दावा वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे.

राष्ट्रीय उद्यानात जगभरातील विविध बांबूंच्या प्रजातींचे उद्यान सकारणार आहे. या बांबूंचे रोपण आज मुनगंटीवार तसेच विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते झाले. त्या वेळी व्यासपीठाजवळ ध्वनिक्षेपक लावण्यात आला होता. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांसाठी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यात आला होता.

हे उद्यानच बेकायदा असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. या उद्यानामुळे जैवविविधता धोक्‍यात येऊ शकते, असा आरोप राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य अनिश अंधेरिया यांनी केला; मात्र प्रवेशद्वारापासून चार किलोमीटरचा परिसर हे पर्यटन क्षेत्र असल्याने तेथे अशा प्रकारचे उद्यान करता येऊ शकते, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

वृक्षारोपण पुढे ढकलले
प्रत्येक जंगलाची स्वत:ची वैशिष्ट्ये असतात. त्यांची स्वत:ची वनसंपदा असते. त्यामुळे त्या स्थानिक वनसंपदेव्यतिरिक्त इतर कोणतीही झाडे लावली जाऊ नयेत असे संकेत आहेत. राष्ट्रीय उद्यानातील बांबू वनावरून वाद पेटलेला असल्याने प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. या उद्यानापासून जवळच असलेल्या शिलोंडा भागात वृक्षारोपण करण्यात येणार होते; मात्र आता हा कार्यक्रम अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT