humbaran goan
humbaran goan 
मुंबई

जव्हारमधील हुम्बरण गावात अद्यापही ना पाणी ना वीज; मूलभूत गरजांपासून वंचित

नामदेव खिरारी

जव्हार : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासी भागात आजही मूलभूत गरजांचा अभाव दिसत आहे. जव्हार तालुका हा डोंगरदरीत वसलेला आहे. येथे विकासाच्या नावे अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्या गावात पोहोचल्याचे दिसत नाही. आजही हुम्बरण गावात वीज पोहोचलेली नाही, रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही अशा बिकट अवस्थेत येथील आदिवासी जीवन जगत आहेत. स्वातंत्र्याच्या 73 वर्षांपासून मूळ आदिवासी मूलभूत गरजांपासून दूर असल्याची खंत मनात घोळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

जव्हार तालुक्‍यापासून 35 किलोमीटर अंतरावर हुम्बरण गाव वसलेले आहे. या गावात 40 घरे असून 500 लोकसंख्या आहे. हे गावातील आदिवासी मोलमजुरी करून आपली उपजीविका करत आहेत. गावात जाण्यासाठी आजही रस्ता नाही, त्यामुळे गरोदर महिला किंवा इतर रुग्णांना उपचारासाठी नेताना खूपच यातना सहन कराव्या लागत आहेत. एक महिन्यापूर्वी एकाचा अर्ध्या रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. गावात अद्याप वीज पोहोचली नाही, त्यामुळे आजही अंधारात चाचपडत जीवन व्यतित आहेत. पाणी आण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. तेही नदीतील अशुद्ध पाणी. 

मागील आठवड्यात हुम्बरण गावातील नागरिकांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या गुलाब राऊत यांची भेट घेतली आणि गावात येण्याची गळ घातली. त्यानंतर गुलाब राऊत यांनी गावात भेट दिली. यावेळी त्यांनी रस्ता, पाणी, वीज आणि आरोग्याच्या समस्या गावात कायम असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले आहे. आमच्या गावात आजही सरपंच, ग्रामसेवक फिरकले नाहीत. पुढारी मतदानाच्या वेळी येऊन फक्त आश्‍वासन देतात. मात्र, पुन्हा फिरकत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी बोलून दाखवली. 

हुम्बरण गावातील नागरिकांनी त्यांच्या गावात नसलेल्या सोईसुविधाचा व्यथा मंडल्या. त्यामुळे मी स्वतः या गावाला भेट दिली. तीन किलोमीटर चालत गेली आहे. भेट दिल्यानंतर तेथे रस्ता, पाणी, वीजही नाही हे पाहिले. त्यांच्या या असुविधेची दखल घेणार असून समस्यांचा पाठपुरावा करणार आहे. 
- गुलाब राऊत, कासटवाडी, जि.प. सदस्या 

आमच्या गावात आजही रस्ता नाही, त्यामुळे गरोदर महिला अथवा इतर रुग्णांना डोली बांधून न्यावे लागत आहे. अनेकांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे. 
- राजू रावते, ग्रामस्थ, हुम्बरण. 

(संपादन : वैभव गाटे)

Humbaran village in Jawahar is deprived of basic necessities

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT