मुंबई

दरवाजे तुटल्याने शेकडो शेतजमींनीना खाऱ्या पाण्याचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धन : लॉकडाऊनच्या काळात शेतीविषयक कामांना सरकारने शिथिलता दिली आहे. मात्र श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन, कापोली, शिस्ते, वडवली, दिवेआगर येथील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या तडाख्यात सापडत आहेत.

काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील अनेक भागांत शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची खरीप हंगामात सर्व आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागही सज्ज झाला आहे; मात्र बोर्ली-पंचतन व आजूबाजूच्या गावातील शेकडो शेतकरी हताश झाले आहेत. कापोली, शिस्ते, वडवली, दिवेआगर येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये खाऱ्या पाण्याचा शिरकाव होत असल्याने शेतीच्या कामांना अडथळा निर्माण होत आहे. हे पाणी समुद्रात येणाऱ्या उधानामुळे शेतात घुसत असल्याचा दावा शेतकरी करत आहेत. 

दिवेआगर व शिस्ते गावालगत असलेल्या सात उघडी परिसरातील पुलावर खाडीचे पाणी शेतीमध्ये न शिरण्यासाठी दरवाजे लावण्यात आले होते; मात्र काही अतिउत्साही समाजकंटकांनी मच्छीमारी करण्याच्या उद्देशाने पाणी रोखण्यासाठी मोठमोठी दगडे टाकून पुलाखालील दरवाज्यांची नासधूस केली आहे. खाडीचे दरवाजे तुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीमध्ये शिरत आहे.
याबाबतची सर्व माहिती वरिष्ठांकडे पाठवलेली असून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीवर्धन खारलँड कार्यालयातून देण्यात आली आहे.

प्रशासनाचा प्रतिसाद नाही
जानेवारी महिन्यापासून नुकसानग्रस्त शेतकरी याचा पाठपुरावा करत आहेत; मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप संतप्त शेतकरी करत आहेत. पावसाळ्याआधी शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळात उपासमारीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT