मुंबई

वाकस येथील गृहप्रकल्पातील शेकडो ग्राहकांची फसवणूक

संचालकाविरुद्ध नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा

सकाल वृत्तसेवा

नेरळ : कर्जत तालुक्यातील वाकस येथे १०० एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिकांची नोंदणी केलेल्या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यातील काही ग्राहकांनी नेरळ पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार ‘विजय इस्टेट ग्रुप’चे संचालक अतीव गाला यांच्याविरुद्ध नेरळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

२०१३ पासून मुंबई मानखुर्द येथील ४४ वर्षीय डॉ. गजानन विनायक कागलकर यांनी ‘विजय ग्रुप हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड’ची जाहिरातीवरून वाकस येथे उभ्या राहत असलेल्या गृहप्रकल्पात २०१७ मध्ये सदनिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्यातील एक सदनिका सुमारे १७ लाख रुपयांना निश्चित केली.

ठाण्यातील कार्यालयात सदनिकेबाबत कागलकर यांचे विजय ग्रुपचे सुनील सोनी यांच्याशी चर्चा झाली. सुरुवातीला दहा हजार रुपयांची रक्कम बँकेच्या डेबिट कार्डमधून घेण्यात आली. त्यानंतर कर्जत येथील उपनिबंधक कार्यालयात ऑगस्ट २०१७ मध्ये सदनिकेची नोंदणी झाली. या सदनिकेसाठीची उर्वरित रक्कम हप्त्यांद्वारे देण्याचे निश्चत झाले.

त्यानुसार कागलकर यांच्या खात्यातून ही रक्कम वळती केली जात होती. २०१८ मध्ये या गृहप्रकल्पाचे काम बंद झाले. त्याची माहिती मिळताच कागलकर यांनी चौकशी केली असता वाकस येथील गृहप्रकल्पात हजारांहून अधिक ग्राहकांनी चर्चगेट येथील ‘रेरा’ कार्यालयात तक्रारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. रेरा न्यायालयाने संचालक अतीव गाला यांना संबंधित सर्व सदनिका धारक यांना त्यांनी नोंदणी केलेली घरे द्यावीत वा त्यांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. मात्र, गेल्या वर्षभरात ‘विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड’कडून एकाही सदनिकाधारकास रक्कम परत मिळालेली नाही.

१२०० घरांची नोंदणी

विजय इस्टेटच्या वाकस येथील गृह प्रकल्पात ८००० सदनिका बांधल्या जाणार होत्या, त्यातील १२०० घरांची नोंदणी झाल्याची माहिती मिळत आहे. त्या सर्वांचीही फसवणूक झाल्याचे तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन फसलं

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT