मुंबई

VIDEO: अलिबागमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग: मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वाढत आहे. 17 मिमीच्या सरासरीने जिल्ह्यात मागील 24तासात पाऊस पडला असून माथेरान (34), पेण (,38) कर्जत(29), अलिबाग(27) या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाबरोबरच वर्याचाही वेग वाढत आहे. 

चक्रीवादळाच्या पार्श्व भूमीवर नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. निसर्ग चक्रीवादळ अलीबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने येथे एन डी आर एफ च्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवरील भागात जास्त सतर्कता बाळगण्यात येत आहे. वाऱ्याचा वेग सध्या  तासी 30 किलोमीटर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात येत आहे. हा वेग 100 किलोमीटर पेक्षही जास्त वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  पावसाचे आणि वर्याचेही प्रमाण हळूहळू वाढत असल्याने येथील नागरिकांमध्ये वादळाची भीती वाढू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : दिवाळीला आजीबाईंची एकही पणती विकली गेली नाही, पण पोलिसांनी जे केले ते पाहून तुमचंही हृदय भरुन येईल 

Tragic Accident Kolhapur : चुकीच्या दिशेने आयशर टेम्पो आल्याने कोल्हापूर –राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

४ वर्षांनी संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा भाग, असा होणार शेवट

Mohammed Shami चा काढला काटा! सातत्याने धावा करणाऱ्या 'मुंबई'च्या खेळाडूकडे आगरकरचं दुर्लक्ष; पुनरागमन झालं अशक्य

आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले

SCROLL FOR NEXT