Crime News sakal
मुंबई

Dombivali Crime : संशयातून पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; पत्नीची प्रकृती गंभीर

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी सुरेख हिवाळे हिची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुरेखा हिचा पती राजू हिवाळे याचा पोलीस शोध घेत आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राजू आणि सुरेखा हिवाळे हे आपल्या दोन मुलांसह राहतात. दोन मुले जन्माला येईपर्यंत संसाराचा गाडा सुखात चाललेला असतानाच हिवाळे दाम्पत्यामध्ये वितूष्ट आले. राजू हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. सोमवारी पहाटेच्या सुमारास याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या राजू याने स्वयंपाकघरातील भाजी चिरण्याच्या चाकूने सुरेखावर हल्ला चढविला. पोटावर सपासप वार झाल्याने सुरेखा रक्ताच्या थारोळ्यात पडली. हे पाहून राजूने तेथून पळ काढला. पहाटेची वेळ असल्याने सर्वत्र शांतता होती. अशा वेळी सुरेखाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या रहिवाश्यांनी हिवाळे यांच्या घराकडे धाव घेतली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेखाला उचलून केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. तथापी प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्यामुळे तिला तात्काळ मुंबईतील सरकारी रुग्णालयाकडे हलविण्यात आले. याच दरम्यान जखमी सुरेखाने दिलेल्या जबानीतून पतीने केलेल्या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले.

याप्रकरणी हिवाळे यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेखाला संपविण्याचा हेतूने केलेल्या हल्ल्यानंतर राजू पसार झाला असून त्याला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शांतता करारानंतर मोठी बातमी! गॅस टंचाईपासून सुटका, शिपिंग मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

BARTI Schemes: बार्टीच्या योजनांचा आढावा; अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार प्रशिक्षण, शिष्यवृत्ती वाढवण्याचे माधुरी मिसाळ यांचे निर्देश

UPSC Forest Service Aid: युपीएससी भारतीय वनसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र अनुसूचित जाती उमेदवारांना ‘बार्टी’कडून ५० हजारांचे अर्थसाह्य

Fact Check: तुमचा आदर करतो, पण...! वैभव सुर्यवंशीने खरचं संजय मांजरेकर यांना उलट उत्तर दिलं? पोस्ट व्हायरल, एकच खळबळ

अखेर सुभेदाराच्या घरात प्रियाची एंट्री झालीच! सगळ्यांसमोर अर्जुन ठरणार खोटा, प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र वैतागले

SCROLL FOR NEXT