मुंबई

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा


भिवंडी : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणे यांनी चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी सजा ठोठावली आहे. बबलू रमेश पाटील (४५ रा. वेहळे) असे पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या नराधम पतीचे नाव आहे.

तालुक्‍यातील वेहळे गावातील बबलू याचे नवी मुंबई तुर्भे येथील रेश्‍मा (४०) हिच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला दोन मुलीही आहेत; मात्र बबलू हा पत्नी रेश्‍मा हिच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद करून भांडण करीत होता. तो पत्नीवर वारंवार संशय घेऊन तिचा छळ करीत असे. त्यामुळे रेश्‍मा हिने जाचाला कंटाळून ३१ डिसेंबर २०१६ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

त्यामुळे मृत रेश्‍मा हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारपोली पोलिस ठाण्यात बबलू याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा सखोल तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राहुल इंगळे व शांताराम महाजन व पोलिस पथकातील कर्मचारी जी. जी. पाचेगावकर यांनी करून सर्व साक्षी-पुरावे न्यायालयासमोर सादर करीत दोषारोपपत्र दाखल केले होते.

या गुन्ह्याचा युक्तिवाद ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. यात सरकारी बाजू महिला वकील एस. एच. म्हात्रे यांनी भक्कमपणे मांडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणे यांनी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेऊन या गुन्ह्यात बबलू पाटील यास दोषी ठरवून चार वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT