Sameer Wankhede Kranti Redkar
Sameer Wankhede Kranti Redkar 
मुंबई

'मला काही बोलायचं नाही', समीर वानखेडेंनी एवढंच म्हटलं आणि....

दीनानाथ परब

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan khan drug case) मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) अडचणीत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यात एक पंच प्रभाकर साईलने आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची डीलचा आरोप केला. रोज एकापाठोपाठएक आरोप होत असल्यामुळे समीर वानखेडे यांच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

समीर वानखेडे यांचे कुटुंब हिंदू नसून मुस्लिम आहे. ते मुस्लिम रितीरिवाजाचे पालन करतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यांचे पहिले लग्न मुस्लिम युवतीसोबत झाले होते. त्या निकाहचे फोटोही त्यांनी सार्वजनिक केले होते. समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी समोर येऊन आपण हिंदूच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एका बाजूला धर्मावरुन आरोप होत असताना दुसऱ्याबाजूला पैशांच्या व्यवहाराचा आरोप झाला आहे.

काल समीर वानखेडे दिल्लीला गेले होते. प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. आज समीर वानखेडे यांना पत्रकारांनी गाठले असता, त्यांनी 'मला काही बोलायचे नाही' असे सांगून ते निघून गेले. समीर वानखेडे एनसीबीचे मुंबई झोनचे संचालक आहेत. कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईमुळे समीर वानखेडे हे नाव देशभरात चर्चेत आहे.

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. २५ दिवसानंतरही त्याला जामीन मिळू शकलेला नाही. देशातील नामवंत वकील आर्यनची बाजू कोर्टात मांडत आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दलच संशय निर्माण केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT