sharad pawar amol kolhe. 
मुंबई

पवारांना पंतप्रधानपदी पहायचंय; कोल्हेंनी सूचकपणे व्यक्त केली इच्छा

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली इच्छा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान व्हावं असा मानस खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार कोल्हे बोलत होते.

खासदार कोल्हे म्हणाले, "देशातल्या कुठल्याही नेत्याला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. भूजच्या भुकंपावेळी शरद पवार यांची अटल बिहारी वाजपेयी यांची वाहवा केली होती. सध्या देशाला सांप्रदायिकतेचे हादरे सहन करावे लागत आहेत. यानं देश रक्तबंबाळ झाला आहे, त्यामुळं तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे." २६ खासदार असलेली व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रतील व्यक्ती पंतप्रधानपदी का बसू शकत नाही, याचा विचार करण्याची गरज आहे, अशा सूचक पद्धतीनं त्यांनी शरद पवारांना पंतप्रधानपदी पहायचं असल्याचा मानस बोलून दाखवला.

शरद पवार शाहु महाराजांचे वैचारिक वारसदार

कोल्हे पुढे म्हणाले, शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याच महिलांनी आज प्रगतीची शिखरं गाठली आहेत. यावरुन पवार महात्मा फुलेंचे वैचारिक वारसदार असल्याचं सिद्ध होतं. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गरज आहे. शरद पवार चाळीस वर्षे दिल्लीच्या राजकारणात आहेत पण त्यांना कधी पाच लाखांचा सूट घालावा लागला नाही. हजारो रुपयांची मशरुम खावी लागली नाहीत, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. शरद पवार हे 'हर अर्जुन का सारथी' आहेत. कारण बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तिथले नेते शरद पवार यांना भेटायला त्यांच्याशी चर्चा करायला येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT