icai ca result 2022 topper meet shah rank 1-success story how to prepare for ca exams mumbai sakal
मुंबई

CA Result : मुंबईकर मीत शहा देशात पहिला

मुंबईतील मीत शहा हा ८०.२५ टक्के गुण घेऊन देशात पहिला आला; तर जयपूरचा अक्षत गोयल दुसरा आणि सूरतची सृष्टी केयुरभाई संघवी ही तिसरी आली आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘आयसीएआय’ मार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या ‘सीए’च्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यात मुंबईतील मीत शहा हा ८०.२५ टक्के गुण घेऊन देशात पहिला आला; तर जयपूरचा अक्षत गोयल दुसरा आणि सूरतची सृष्टी केयुरभाई संघवी ही तिसरी आली आहे.मुंबईसह राज्यात ‘सीए’च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्यांची संख्या घटत असतानाच शुक्रवारी मीत शहा याने ती उणीव पुन्हा भरून काढली असल्याच्या प्रतिक्रिया संस्थाचालक, तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ मार्फत मे-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेला देशभरातून एक लाख १८ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या परीक्षेत ग्रुप-१ चा एकूण निकाल २१.९९ टक्के, ग्रुप-२ चा एकूण निकाल २१.९४ लागला. दोन्ही ग्रुपचा निकाल सर्वांत कमी म्हणजे १२.५९ टक्के इतका लागला आहे. परीक्षेत देशभरातून एकूण १२, ४४९ विद्यार्थी यशस्वी ठरले.

अंतिम परीक्षेसाठी खूप परिश्रम घेतले हेाते.‍ देशात पहिला येईन, याची खात्री नव्हती, पण टॉपरच्या यादीत असेन, असे वाटले होते. देशात पहिला आल्याने खूप आनंद झाला आहे.

- मीत शहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT