pregnancy 
मुंबई

गर्भवतींच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष नको; 88 टक्के पॉझिटिव्हमध्ये नाहीत लक्षणे

मिलिंद तांबे

मुंबई : गर्भवती महिलांच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. गर्भवती महिलांच्या केलेल्या अभ्यासात 88 टक्के पॉझिटिव्ह महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. अशा प्रकरणात जर या महिलांच्या कोरोना चाचण्या केल्या नाहीत तर त्यामुळे प्रसुतीच्या वेळी वैद्यकीय कर्मचारी तसेच वॉर्डमधील इतर शिशू तसेच त्यांच्या मातांना ही कोरोनाचा धोका होऊ शकतो.

'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद' तसेच 'नॅशनल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टीव्ह हेल्थ -परळ ने 'मेडीकल एज्युकेशसन एँड ड्रग्स' सह एक 'प्रेग कोविड' नावाचा नोंदणी विभाग तयार आहे. यामध्ये राज्यातील 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तसेच मुंबईतील नायर रूग्णालयात येणा-या महिलांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
 
एप्रिल 25 ते मे 20 दरम्यान राज्यातील 15 वैद्यकीय महाविद्यालय तसेच नायर रूग्णालयातील गर्भवती महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या काळात रूग्णालयात 1,140 महिला दाखल झाल्या होत्या, ज्यात 321 महिलांना कोरोना झाला होता. यातील केवळ 37 (11.5) टक्के महिलांना कोरोनाची लक्षणे होती असे प्रमुख अभ्यासक तसेच आयसीएमआर-एनआयआरआरएचचे प्रमुख डॉ. राहुल गजभिये यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले. लक्षणे असणा-या महिलांना ताप, थंडी, जुलाब तसेच श्वास घेण्यास त्रास तसेच वास घेण्याची क्षमता कमी झाली असल्याच्या तक्रारी होत्या. आयसीएमआरने या सर्व महिलांची कोरोना चाचणी कऱण्यास सांगितले होते. त्यानंतर या महिलांची प्रत्येक निरिक्षणे नोंदवण्यात आल्याचे ही ते पुढे म्हणाले.

आयसीएमआर-एनआयआरआरएचच्या संचालिका डॉ.स्मिता महाले, डॉ.राहुल गजभिये, डॉ दिपक मोदी, नायर रूग्णालयातील डॉ. निरज महाजन तसेच एमईडीडीचे डॉ.राकेश वाघमारे यांनी या अभ्यासात सहभाग नोंदवला. गर्भवती महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्या अति जोखमीच्या वर्गवारीत येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत त्यांना अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे ही या डॉक्टरांनी सांगितले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

Dhurandhar 2 Trailer: रहमान डकैत मेला… आता लियारीचा नवा बादशाह कोण? ‘धुरंधर २’ ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा धडाकेबाज इशारा!

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS

SCROLL FOR NEXT