ICSE 10th written examination from today CBSE exams from Tuesday mumbai
ICSE 10th written examination from today CBSE exams from Tuesday mumbai sakal
मुंबई

आजपासून आयसीएसईची दहावीची लेखी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयसीएसई केंद्रीय मंडळाच्या दहावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेची सुरुवात सोमवार (ता. २५)पासून देशभरात होत आहे. याच मंडळाच्या बारावीची परीक्षा मंगळवारी (ता. २६) होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसईच्या दहावी-बारावीची परीक्षाही २६ एप्रिलपासून होत आहेत.

दोन्ही मंडळांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी दोन्ही मंडळांकडून विद्यार्थ्यांना काही दिवस अगोदरच हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्राची माहितीही प्रत्येक शाळा आणि परीक्षा केंद्रावर व संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयसीएसई परीक्षेला विद्यार्थ्यांना कोरोनाच्या लशीपासून सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाकडून देान दिवसांपूर्वी एक परिपत्रक जारी करून त्यासाठीची माहिती देण्यात आली होती.

दुसरीकडे सीबीएसईनेही आपल्या दहावी-बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या लिहिण्याचा सराव कमी झाल्याचे लक्षात घेऊन परीक्षा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना ४० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT