मुंबई

आरतीच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी भन्नाट आयडिया; सोसायटीच्या मजल्यांमध्ये लावले लाऊड स्पीकर

रजनिकांत साळवी


प्रभादेवी :- कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सव साधेपणात करण्याचे आव्हान शासनाने केले आहे. याला प्रतिसाद देत प्रभादेवी येथील प्रभा विनायक सोसायटीने सोसायटीच्या दोन  मजल्यावर लाऊड स्पीकर लावले असून कोणाच्याही घरी न जाता लाऊड स्पीकर वरून एकाच वेळी सर्वांच्या घरी सामुदायिक आरती करण्यात येते.  

कोरोंनाच्या काळात कोणाच्याही घरी न जाता प्रभा विनायक सोसायटीत एकाच वेळी सर्वजण अशा पद्धतीने घरच्या घरी आरती करत असल्याने त्यांच्या या उपक्रमाला परिसरातून दाद मिळत आहे. गौरी पूजणाच्या दिवशी सोसायटीतिल रहिवाशी शारीरिक अंतर पाळून आपआपल्या बाल्कनीत उभे राहून टाळ्या वाजवून आरती करण्यात येणार आहे. लाऊड स्पीकर द्वारे करण्यात येणाऱ्या सामुदायिक आरतीमुळे यातून प्रत्येकालाच घरी आरती करण्याचा आनंद मिळत असल्याचे सोसायटीचे सचिव दीपक जाधव यांनी सांगितले. सोसायटीतील सदस्य राजेश घाग, अमेय जावळकर, उमेश घवाले, राहुल पेटकर, अशोक करंगूटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला.

-    कृत्रिम तलावाची निर्मिती
गणेश विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी सोसायटीच्या आवारातच कृत्रिम तलावची निर्मिती केली असून सोसायटीतिल राहिवाशांचे गणेश विसर्जन या कृत्रिम हौदात करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जित झालेल्या मूर्तीची माती कुंडीत टाकून त्यात वृक्ष रोपण करण्यात येणार आहे.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१ जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात बदल, केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

MD Drugs: पश्चिम महाराष्ट्रात एमडी ड्रग्जसाठी गुंडांची हातमिळवणी! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तयार झाली अभेद्य साखळी

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

SCROLL FOR NEXT