मूर्तींच्या विटंबनेनंतर रास्ता राेकाे करताना नागरिक . 
मुंबई

पोयनाडमध्ये मूर्तीची विटंबना 

प्रमाेद जाधव

अलिबाग: तालुक्‍यातील पोयनाड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भैरवनाथ मंदिरातील मूर्तीची मंगळवारी (ता.17) विटंबना करण्यात आली. लक्ष्मी-नारायण मंदिरातही असाच प्रकार घडला आहे. त्याचे तीव्र पडसाद आज उमटले. या घटनेनंतर स्थानिकांनी अलिबाग मार्गावर रास्ता रोको केले. बाजारपेठेतही बंद पुकारला. या प्रकरणातील संशयित आरोपीला काही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र त्याने हे कृत्य का केले, ते समजू शकले नाही. 

पोयनाड बाजारपेठेमध्ये अग्रवाल समाजाचे लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच भैरवनाथ मंदिर आहे. गावातील रहिवासी राहुल अग्रवाल हे सकाळी दहा वाजता लक्ष्मी-नारायण मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी त्यांना मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. मंदिरात आगही लागली होती. या वेळी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेची माहिती पोयनाड पोलिसांना दिली. परंतु ते वेळेवर घटनास्थळी आले नाहीत, असा आरोप आहे. पोलिसांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. 


अपर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, सहायक पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी काही वेळानंतर घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यावर भाविक शांत राहिले. काही वेळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण झाली होती. 

संशयिताचे नाव भगवान 
मूर्तींच्या विटंबना प्रकारानंतर पोयनाड परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. 
जाळपोळ आणि नुकसान करणारी संशयित व्यक्ती पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. त्याचे नाव भगवान असे आहे. तो पोयनाड परिसरातील एका पोल्ट्रीमध्ये काम करीत आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT