Idol of Vitthal surgically removed from leg; Decision of Thane District General Hospital Administration Sakal
मुंबई

Thane News : पायातून शस्त्रक्रिया करून काढली विठ्ठलाची मूर्ती; ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचा निर्णय

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळणाऱ्या योग्य उपचार पद्धतीमुळे हे रुग्णालय गृग्नांच्या पसंतीस उतरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : देवघरात साफसफाई करीत असताना, स्टुलावरून पडल्याने एका ७५ वर्षीय आजोबांच्या पायात काही तरी घुसल्याचे त्यावेळी त्यांना जाणविले. यावेळी पायाला झालेली जखम बरी होवून देखील पाय दुखत असल्याने त्यांनी पायाचा एमआरआय काढला असता, त्यात काही तरी असल्याचे निशापंना झाले.

त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तळपायात विठ्ठलाची मूर्ती असल्याचे आढळून आले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळणाऱ्या योग्य उपचार पद्धतीमुळे हे रुग्णालय गृग्नांच्या पसंतीस उतरत आहे. त्यात सध्याच्या घडीला हे रुग्णालय मेंटल हॉस्पिटलच्या शाजरी आरोग्य विभागाच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात सुरु आहे.

या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यानंतर अनेक छोट्या मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अशातच मंगळवारी देखील एका ७५ वर्षीय आजोबांच्या तळपायाची यशस्वी शस्त्रक्रिया करत त्यांच्या पायात घुसलेली मूर्ती काध्नाय्त जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

मुलुंड पश्चिम येथे राहणारे ७५ वर्षीय आजोबा हे देवघरात साफसफाईचे काम करत असताना, चार महिन्यापूर्वी स्टुलावरून पडले, त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काही तरी घुसल्याने त्यांना जखम झाली होती.

ती जखम पूर्णपणे बरे झाल्यानंतर देखील पाय दुखत होता. तसेच पायातून पाणी येत असल्याने त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या पायाचा पहिला एमआरआय काढला त्यावेळी तो नॉर्मल आला होता. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा एमआरआय काढल्यानंतर काहीतरी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अर्थोपेडीक सर्जन डॉ. विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या ७५ वर्षीय आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत, अर्धा तासाच्या यशस्वी प्रयत्नाने पायातून ती वस्तू बाहेर काढली. यावेळी ती लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT