मुंबई

विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय न घेतल्यास, "#राज्यपालहटवामहाराष्ट्र_वाचवा" मोहिम राबवणार! वाचा काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वटहुकूम जारी करून अपवादात्मक वर्षं म्हणून सर्वच राज्यातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना तसेच एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनादेखील सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करणाऱ्या राज्यपालांची पदावरून हक्कलपट्टी करावी, अशी मागणी विद्यार्थी भारती छात्र संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली आहे.

10 लाख विद्यार्थ्यांना कोरोना झालाच तर त्याची जबाबदारी, परीक्षा घेण्याचा अट्टाहास असलेले राज्यपाल स्वतः घेतील का? असा सवाल विद्यार्थी भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी उपस्थित केला.

राज्यपाल हटवा मोहीम
राज्यपालांना आपल्या हिताचा विचार करायचा नसेल, तर त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या मागणीसाठी ’#राज्यपालहटवामहाराष्ट्र_वाचवा’ ही मोहीम राबवावी लागेल असे राज्यसचिव जितेश पाटील यांनी म्हटले आहे.

...तर "झोप मोड आंदोलन" करू
कोरोनाच्या काळातही परीक्षा घेतल्या गेल्या, तर विद्यार्थी भारतीतर्फे राज्यपालांच्या बंगल्यावर "झोप मोड आंदोलन" करण्यात येईल व परीक्षांवरही बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा मंजिरी धुरी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

PM मोदी आणि मॅक्रॉन मुंबईत, प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘रेड लाइन’ सज्ज; एप्रिलपासून मेट्रो धावणार, २३ किमी मार्गाच्या चाचण्या यशस्वी..

MHADA Mumbai Lottery : मुंबईत स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी ! म्हाडाच्या FCFS सदनिकांसाठी आजपासून अर्ज नोंदणी सुरु, काय आहे प्रक्रिया ?

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT