raut.jpg 
मुंबई

विरोधीपक्षाला धमाके करायचे असतील, तर करुं दे त्यांचाही वेळ जाईल - संजय राऊत

दीनानाथ परब

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझेंना अटक झाल्यामुळे सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. हा संपूर्ण विषय गृहखातं आणि पोलीस दलाशी संबंधित असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री किंवा पोलिस आयुक्तांची बदली होईल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यासंबंधी आज संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "खातेबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीतील विषय असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे प्रमुख यासंबंधी निर्णय घेतील" असे संजय राऊत यांनी सांगितले. 

सचिन वाझे आणि शरजील इमाम यांना मुख्यमंत्री पाठिशी घालतायत असा विरोधी पक्षांकडून आरोप होतोय, त्यावर संजय राऊत म्हणाले की, "शरजील इमाम हे सदगृहस्थ सध्या उत्तर प्रदेशात आराम फर्मावत आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने त्यांना पकडून महाराष्ट्राकडे सोपवावं."

शरजील इमामवर तो सुटला पाहिजे, अशी कलम लावली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होतोय, या आरोपावर संजय राऊत म्हणाले की, "शरजील इमामवर कोणती कलम लावावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन करावं, ते स्वत: उत्तम वकिल आहेत" असे संजय राऊत म्हणाले. 

"पुढची साडेतीनवर्ष सरकारला चीतपट करणं कोणालाही जमणार नाही. विरोधी पक्ष गौप्यस्फोट, धमाके करणार असेल, तर करुं दे, त्यांचाही वेळ जाईल. फक्त सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात फटाक्यांवर बंदी आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं" असे राऊत म्हणाले.  

"ज्या राज्यात भाजपाच सरकार नाही, तिथे कारवाई करण्याचा काही यंत्रणांना छंद जडला आहे.  सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आपल्याला ते दिसलं. महाराष्ट्रासारखच पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हेच सुरु आहे. त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही" असे राऊत यांनी सांगितलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT