मुंबई

अशीच परिस्थिती राहिल्यास जूनअखेर मुंबईतील रुग्णसंख्या एक लाखावर? ही धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण एक लाखावर गेले आहेत. त्याचवेळी मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या जूनअखेर एक लाखापेक्षा जास्त असेल अशी भिती व्यक्त होत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जूनअखेर एक लाख लोकांवर उपचार सुरु नसेल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबईतील रुग्ण वाढत आहेत, पण त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली नाही. त्यामुळे या महिनाअखेर मुंबईतील एकूण कोरोना रुग्ण 75 ते 80 हजार असू शकतील. मात्र काही वरिष्ठ आधिकाऱ्यांनी एकंदर रुग्ण संख्या एक लाख झाली तरी प्रत्यक्षात उपचार  जास्तीत जास्त पन्नास हजार बाधिंतावर सुरु असतील असे सांगितले.

महानगरीतील उपचारांची गरज असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले तर सध्याच्या अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन बेड, व्हँटिलेटर युनिटमध्ये वाढ करावी लागेल. सध्या मुंबईतील अतिदक्षता विभागातील 99 टक्के तर व्हँटिलेंटर युनिट क्षमतेच्या 95 टक्के उपयोग होत आहे, महापालिकेतील आधिकाऱ्यांनी यापूर्वीच ही क्षमता वाढवण्यासाठी विचार केला आहे. आयसीयू तसेच ऑक्सीजन बेडची संख्या वाढवण्यासाठी खाजगी तसेच मुंबईतील लहान रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. अतिरीक्त व्हँटिलेटरची आवश्यकता भासणार आहे.  

मुंबईतील कोरोना रुग्ण जूनअखेर किती असतील हे समजण्यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. आपल्याला रुग्ण वाढीचा ट्रेंड जूनच्या तिसऱ्या आठवड्यात कसा आहे, यावरुन नेमका अंदाज बांधता येईल, असेही काही आधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, पावसाळा सुरु झाला आहे. या परिस्थितीत मुंबईतील दाटीवाटीच्या विभागात मलेरिया, डेंगी, टायफाईडची साथ येऊ शकेल. कोरोनाची साथ असताना याचे आव्हान जास्त खडतर असेल असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT