sandeep 1.jpg 
मुंबई

जर ठाण्यात रोखलं, तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करु - संदीप देशपांडे

पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तर संघर्ष होण्याची दाट शक्यता.

दीनानाथ परब

मुंबई: दहीहंडी (dahihandi) उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) आक्रमक होत चालली आहे. ठाण्यात आयोजनावर ठाम असलेले मनसे नेते अविनाश जाधव (avinash jadhav) आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी टि्वट करुन दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा आवाज दिला आहे.

कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाकरे सरकारने बंदी घातली आहे. पण दहीहंडीचे मोठे आयोजक असलेले घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम, अविनाश जाधव उत्सवाच्या आयोजनावर ठाम आहेत. मनसेने हा विषय हिंदु सणांशी जोडला आहे. 'जर ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू' अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तर संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.

नौपाडा परिसरातील (thane dahihandi) भगवती शाळेच्या मैदानात दहीहंडी उत्सवावरुन पोलीस आणि मनसैनिक आमने-सामने आले होते. मनसैनिकांकडून दहीहंडीसाठी स्टेज उभारण्याचे काम सुरु असताना पोलीस तिथे येऊन पोहोचले.

त्यांनी स्टेज उभारण्याचं काम रोखलं व दहीहंडीचे आयोजक मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. हिंदुंच्या सणांना खीळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा सूर आहे. मोर्चे, सभा, आंदोलनं, लग्न याला गर्दी चालते, आणि दहीकाला उत्सवाला निर्बंध का? असा सवाल आहे. मनसेला दहीहंडी उत्सव साजरा करण्यापासून रोखण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांशी अविनाश जाधव यांचा शाब्दीक वाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT