Scholarship News sakal
मुंबई

Scholarship News : शिष्यवृत्तीच्या तपशिलाकडे दुर्लक्ष ; राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाकडून लवकरच महाविद्यालयांवर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी पदवीधर प्रशिक्षणार्थी, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी पदवीधर प्रशिक्षणार्थी, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, देशातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. याची दखल घेत आयोगाने वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.तत्परतेने तपशील सादर न करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने दिला आहे.

यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील निधीच्या बेहिशेबी वापरात पारदर्शकता येण्यास मदत होईल, असा दावाही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीवरून वाद निर्माण होत आहेत.

याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला पदवीधर इंटर्न, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा तपशील चार आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अंतर्गत आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्तीचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत त्याचा तपशील त्यांच्या संकेतस्थळावर मासिक अपडेट केला जावा आणि वर्षाच्या शेवटी संपूर्ण तपशील आयोगाला ई-मेलद्वारे पाठवावा, असेही सुचवण्यात आले.

माहिती सादर करण्याचे निर्देश

राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने वारंवार तपशील सादर करण्याचे निर्देश देऊनही अनेक वैद्यकीय महाविद्यालयांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचे तपशील आयोगाकडे सादर केलेले नाहीत. याची गंभीर दखल घेत आयोगाने संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत या कारवाईला सुरुवात केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT