Air Pollution sakal
मुंबई

Mumbai News : वायू प्रदूषण रोखण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष; टास्क फोर्स बाबत चालढकल

पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह यांनी तसे प्रस्तावित केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली जाणार होती. पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह यांनी तसे प्रस्तावित केले होते. मात्र दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप स्थापनच झालेली नाही. त्यामुळे पालिका प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासन गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे.

हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने भर दिला आहे. याबाबत पालिकेने नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्यासाठी १ एप्रिलपासून प्रत्येक वॉर्डमध्ये तीन टास्क फोर्स सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या टास्क फोर्समध्ये आरोग्य, घनकचरा आणि मेडिकल ऑफिसरचा समावेश करण्यात येणार आहे.

ही टास्क फोर्स विभागवार पाहणी करणे, सूचना देणे आणि कारवाई करणे अशी कामे करणार आहे. यामध्ये नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाईपासून ‘स्टॉप वर्क’ नोटीस देण्यापर्यंत कार्यवाही होऊ शकते. १ एप्रिल रोजी टास्क फोर्स स्थापन केली जाणार होती. मात्र ही मुदत संपून दहा दिवस उलटले, मात्र अजूनही टास्क फोर्सची स्थापना झालेली नाही, असे ट्विट काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

Child Death Road Accident : यात्रेला जाताना जीपची दुचाकीला धडक, 5 वर्षांच्या चिमुकल्याचा डोळ्यादेखत मृत्यू; आई-वडील आणि बहीण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT