Iirshralwadi sakal
मुंबई

Iirshralwadi Landslide : दुर्घटनाग्रस्तांना मानसिक आधाराची गरज

इर्शाळवाडी दुर्घटनेत आई-वडील, मुलेबाळे; तर काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलेल्यांचे तसेच गावातील इतर कुटुंबांचे तात्पुरते कंटेनरमध्ये स्थलांतर केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

खालापूर - इर्शाळवाडी दुर्घटनेत आई-वडील, मुलेबाळे; तर काहींनी संपूर्ण कुटुंब गमावलेल्यांचे तसेच गावातील इतर कुटुंबांचे तात्पुरते कंटेनरमध्ये स्थलांतर केले आहे. दुर्घटनाग्रस्तांना तात्पुरता निवारा जरी भेटला असला तरी कोसळलेल्या संकटातून सावरण्यासाठी अनेकांना मानसिक आधाराची गरज भासत आहे. दुःख हलके करण्यासोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक २४ तास या ठिकाणी लक्ष ठेऊन आहे.

सध्या कंटेनरमध्ये शून्य ते दहा वयोगटापर्यंतची २२ मुले वास्तव्यास आहेत. तसेच ११ ते २० वयोगटातील जवळपास ३२ जण आहेत. निराधार झालेल्या अनेक मुलांना सध्या नातेवाईक आधार देत आहेत. प्रशासनदेखील नैसर्गिक संकटामुळे मनाने खचलेल्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेत आहे. डॉक्टर, सहायक डॉक्टर परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका अशा आरोग्य विभागाच्या दहा जणांची दोन पथके या ठिकाणी नियमित तपासणी करत आहेत.

कुटुंबांना आरोग्य शिक्षण

पावसाळा असल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता असल्याने तापाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणामध्ये रुग्णांच्या रक्ताची नमुना तपासणी केली असून, ते डेंग्यू आणि मलेरिया निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. तपासणीमध्ये आढळलेल्या तापाच्या दोन रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. परिसरात पावसाने साचलेल्या पाण्यामध्ये अळीनाशक फवारणी करून जे पाणी वाहते करणे शक्य होते ते वाहते करण्यात आले. त्याचबरोबर कुटुंबांना आरोग्य शिक्षण दिले जात आहे.

जिल्हास्तरीय पथकाची भेट

इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांचे तात्पुरत्या कंटेनरमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्हास्तरीय आरोग्य पथकाने भेट दिली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजाराम भोसले, डॉ. सीमा पाईकराव, डॉ. अभिजित झुरे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच हिवताप कर्मचारी वैशाली घरत, धनंजय पाटील, गणेश राठोड, वैभव कदम, धर्मेंद्र पुगावकर, आरोग्य सेवक वैभव म्हात्रे, किशोर धनवे यांनी भेट दिली.

छावणीमध्ये सध्या १३२ जण आहेत. प्रचंड मानसिक धक्का बसल्यामुळे अनेक जण निःशब्द असून त्यांच्याशी तपासणीच्या दरम्यान संवाद साधत आहोत. आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात असून पिण्याच्या पाण्याचीदेखील नियमित तपासणी केली जात आहे.

- डॉ. सीमा पाईकराव, वैद्यकीय अधिकारी, लोहप प्राथमिक आरोग्य केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT