iit bombay  Esakal
मुंबई

IIT Bombay Placements : IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची चांदी! प्लेसमेंटमध्ये ८५ विद्यार्थांना मिळालं एक कोटीहून अधिकचं पॅकेज

आयआयटी बॉम्बे ही जगातील नामांकीत शैक्षणीक संस्थेपैकी एक असून यंदाही येथील विद्यार्थांनी प्लेसमेंट सीझनमध्ये बाजी मारली आहे.

रोहित कणसे

आयआयटी बॉम्बे ही जगातील नामांकीत शैक्षणीक संस्थेपैकी एक असून यंदाही येथील विद्यार्थांनी प्लेसमेंट सीझनमध्ये बाजी मारली आहे. येथील एक-दोन नव्हे तर तब्ब ल ८५ विद्यार्थां असे आहेत ज्याना २०२३-२४ च्या फेज एकमध्ये एक कोटींहून अधिक सीटीसी पॅकेज असलेल्या जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. इतकेच नाही तर येथे २० डिसेंबर पर्यंत तब्बल १,३४० ऑफर्स देण्यात आल्या असून ज्यांच्या माध्यमातून १,१८८ विद्यार्थांना नोकरी देखील मिळाली आहे.

यंदा २,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी रजिस्ट्रेशन केले होते, ज्यापैकी ६० टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात जॉब ऑफर मिळाल्या आहेत. दुसऱ्या टप्पा या महिन्याच्या शेवटी पार पडणार आहे. यावेळी सर्वाधिक सॅलरी ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्पेसमध्ये देण्यात आली आहे. या वर्षी सरारसी वर्षिक पगार हा ३६.९ लाख इतका मिळाला जो मागच्या वर्षी फक्त ३२.२५ लाख इतका होता.

या वर्षी जापान, तैवान, दक्षिण कोरिया, नेतदरलँड, सिंगापूर, हाँगकाँग येथील एकूण ६३ इंटरनॅशनल कंपन्यांनी जॉब ऑफर्स दिले आहेत. कुठल्याही अंतरराष्ट्रीय कंपनीने दिलेले सर्वाधिक सॅलरी २९ लाख हाँगकाँग डॉलर (जवळपास ३ कोटी रुपये) वर्षिक इतकी होती. सरासरी सॅलरी २४.०२ लाख रुपये वर्षासाठी इतकं आहे.

इंजीनियरिंग आणि प्राद्योगिकी साठी सरासरी पॅकेज २१.८८ लाख रुपये, आयटी आणि सॉफ्टवेअर २६.३५ लाख रुपये, फायनान्ससाठी ३२.३८ लाख रुपये, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी ६.९४ लाख रुपये होतं. १ ते १५ डिसेंबरदरम्यान पहिल्या टप्प्याच्या प्लेसमेंटध्ये ३८८ देशातील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी १,३४० ऑफर दिल्या.

यापूर्वी आयआयटी मुंबईच्या २०२२-२३ बॅचमधील एका ग्रॅज्युएटला एका विदेशी कंपनीने ३.६७ कोटी वर्षासाठी सॅलरी जॉब ऑफर देण्यात आली होती. इंस्टीट्यूटने सांगितले की आतापर्यंत सर्वाधिक ऑफर इंटरनॅशनल कंपनीकडून आले आहेत. याखेरीज एका विद्यार्थ्याला भारतातील कंपनीकडून वार्षिक एक कोटीचं पॅकेज मिळालं आहे. देशात होणाऱ्य़ा प्लेसमध्ये हे सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT