IIT Mumbai Sakal
मुंबई

IIT Mumbai : अज्ञात व्यक्तीकडून आयआयटी मुंबईला मिळाली 160 कोटी रुपयांची देणगी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील आयआयटी या संस्थेला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल १६० कोटी रूपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्ही या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली असून या देणगीमुळे आयआयटी मुंबई सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी काही दिवसांपूर्वी IIT मुंबईला ३१५ कोटी रुपये दान केले होते. या संस्थेत त्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी ही रक्कम दान केली होती. नंदन नीलेकणी स्वत: याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.

पण यावेळी आयआयटी मुंबईला एका अज्ञात व्यक्तीने तब्बल १६० कोटींची देणगी दिली आहे. आयआयटी मुंबईचे संचालक प्रोफेसर सुभासिस चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. अज्ञात देणगीदार संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जेव्हा अज्ञात व्यक्ती १६० कोटी रुपयांची देणगी देतो तेव्हा ही सर्वांसाठी आश्चर्याची आणि अनोखी घटना ठरते. ही रक्कम ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबिलिटी रिसर्च हबच्या स्थापनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सुभासिस चौधरी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, याचिकाकर्त्यांना झटका

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

मराठी की अमराठी... तेजश्री प्रधानला दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवाय? म्हणते- माझा होणारा नवरा फक्त...

SCROLL FOR NEXT