Bank Account Sakal
मुंबई

बेकायदा बांधकाम प्रकरण; 40 विकासकाची बॅंक खाती गोठवली

कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागाची बनावट परवानगी कागदपत्र तयार करुन रेराचे नोंदणी प्रमाणपत्र घेत 65 विकासकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागाची बनावट परवानगी कागदपत्र तयार करुन रेराचे नोंदणी प्रमाणपत्र घेत 65 विकासकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. शासनाची फसवणूक व बेकायदा बांधकाम याप्रकरणी 65 विकासकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत विशेष तपास पथकाकडून याचा तपास केला जात आहे.

मंगळवारी विशेष तपास पथक कल्याण डोंबिवलीत दाखल झाले असून त्यांनी आपला तपास सुरु केला आहे. 40 विकासकांची विविध बॅंक खाती विशेष तपास पथकाकडून गोठविण्यात आली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका तसेच 27 गावांत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहीली आहेत. बनावट कागदपत्र सादर करत बांधकाम धारकांनी रेराचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविले आहे. वास्तूविशारद संदिप पाटील यांनी माहिती अधिकारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रकल्पाचा नोंदणी क्रमांक विकासकांनी मिळविल्याची बाब उघडकीस आणली होती.

याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने महापालिकेस फटकारले. त्यानंतर महापालिकेला जाग येऊन महापालिकेने चौकशी सुरु केली. रेराने 65 विकासकांना दिलेली नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याने ही बाब उघडकीस आली. त्यानंतर पालिकेने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 2019 ते 2022 पर्यंत या विकासकांनी बेकायदा इमले बांधले आहेत. या बांधकामासाठी पालिकेच्या बनावट परवानग्या तयार करण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे रेराची नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

ईडीने देखील यात उडी घेतली असून, याचा तपास सध्या एसआयटी मार्फत सुरु असून विशेष तपास पथक कल्याण डोंबिवलीत दाखल झाले आहे. विकासकांची कागदपत्र, बॅंक खाती, परवानगी पत्र आदि गोष्टींचा तपास पथकाने सुरु केला आहे. यातील 40 विकासकांची विविध बॅंकेतील खाती गोठविण्यात आली असून उर्वरीत 25 विकासकांची कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.

तसेच ही बनावट कागदपत्र खरी आहेत असे दस्त नोंदणीकरण कार्यालयात दाखवून ते काम डोंबिवलीतील एका स्टॅम्प वेंडरने केले असल्याची माहिती तपास पथकाच्या हाती लागली आहे. त्यालाही चौकशीसाठी लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.

विकासकांचे जबाब घेतले जात आहेत. त्यांच्या जवळील कागदपत्रांची छाननी केली जात आहे. 40 विकासकांची बॅंक खाती गोठवली आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास पथक पाहणी करत आहे.

- सरदार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तपास पथक प्रमुख, ठाणे गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT